पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा

सातारा लोणंद मार्गावरील वाढे ता.सातारा येथील वेण्णा नदीच्या पुलाशेजारी सोमवारी रात्री ८ च्या सुमारास खेड गावच्या हद्दीतील झाडाची फांदी पडल्यामुळे वाहतूक धीम्या पध्दतीने सुरू होती. सातारा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सुरळीत झाली. यामध्ये कोणतेही नुकसान झाले नाही.

गेल्या दीड दोन महिन्यांपासून सातारा शहर आणि शेजारील तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. झाडाची फांदी पडल्यामुळे वाहतूक धीम्या पध्दतीने सुरु होती. सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास फांदी पडल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक शाखेचे सुहास शिंदे, सागर भोसले हे हजर झाले व त्यांनी सुरुवात केली तसेच झाडाची फांदी तोडण्यास मदत करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी विकास कदम, हेमंत मोरे, दत्ता मोरे, निखिल वाघमळे यांचे सहकार्य लाभले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *