राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना लवकरचं मिळणार १ रुपयात २० लाखाचा अपघात विमा; जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णींचे केंद्रिय मंत्रीनितीन गडकरी यांना निवेदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना लवकरचं मिळणार रुपयात २० लाखाचा अपघात विमा; जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णींचे केंद्रिय मंत्रीनितीन गडकरी यांना निवेदन

सातारा : राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रुपयात २० लाख रुपयांचा अपघात विमा मिळावा अशी मागणी भाजयुमोचेजिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यावरनितीन गडकरी यांनी प्रवाशांबाबत चांगली संकल्पना असून यावर लवकरचं सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते अपघात कमी करण्यासाठी घेत असलेल्या विविध उपाययोजनाउल्लेखनीय आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना रेल्वेप्रमाणे नाममात्र रुपयात २० लाख रुपयांपर्यंतचाअपघात विम्याचे संरक्षण आपल्या मंत्रालयामार्फत देण्यात यावे. भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करताना ही सुविधा केंद्र सरकारच्यामाध्यमातून सुरु आहे. याचं तत्वावर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमा संरक्षणाची सुविधा अत्यावश्यक आहे. त्यासाठीलागणारे पैसे आपण टोलच्या माध्यमातून आपण वसुल करावेत. जेवढा कालावधी संबंधित वाहन महामार्गावरुन प्रवास करेल तेवढ्याकालावधीचा विमा त्या प्रवाशाला मिळेल. रोज लाखो नागरिक खासगी वाहने, बस, ट्रक आणि इतर साधनांनी महामार्गांचा वापरकरतात. रस्ते अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. अपघातामध्ये मृत्यू अथवा गंभीर जखमी झाल्यास कुटुंबियांची आर्थिक मानसिकपरिस्थिती ढासळते. आपण सरकारतर्फे रुपयात हे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले तर प्रवाशांसाठी अतिशय लोकहिताची   दूरगामी परिणाम करणारी ही योजना ठरेल.यावेळी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके, शैलेश संकपाळ,सोशल मीडियासंयोजक प्रथमेश इनामदार उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *