गगनगिरी महाराज परिसराच्या विकासाला नवी दिशा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आरळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भाविकांसाठी सुविधा; वडजाई देवी मंदिरासाठी सोलरचीही सुविधा

आरळे, ता. जि. सातारा : आरळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून श्री वडजाई देवी परिसरात विविध विकासकामांना गती देण्यात येत असून, भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली आहेत. श्री गगनगिरी महाराज परिसरात भाविकांसाठी शौचालय व स्नानगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, वडजाई देवी मंदिरासाठी सोलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्री विश्वगौरव विभूषित प.पू. श्री सद्गुरू स्वामी गगनगिरी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट योगाश्रम, आरळे यांच्या सूचनेनुसार श्री गगनगिरी महाराज परिसरातील भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी शौचालय व स्नानगृहाचे बांधकाम करण्यात आले. या सुविधेमुळे आरळे तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील स्वच्छता व व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे.

या कामासाठी १५ वा वित्त आयोग, ग्रामपंचायत आरळे यांच्याकडून ₹९० हजार, तर जिल्हा परिषद, सातारा – स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ₹२ लाख १० हजार, असा एकूण ₹३ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दरम्यान, वडजाई देवी मंदिरासाठी सोलरची सुविधा ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल दिलीप कदम यांच्या पुढाकारातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिर परिसरात वीजपुरवठ्याच्या दृष्टीने ही सुविधा उपयुक्त ठरणार असून, भविष्यातील वीजखर्चात बचत होण्यासही मदत होणार आहे.

“एकच ध्यास – विकासाचा” या संकल्पनेतून श्री वडजाई देवी परिसरातील विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिक, भाविक आणि धार्मिक स्थळांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

या विकासकामांसाठी श्री लीलाधर घाडगे साहेब, श्री गगनगिरी महाराज परिसरातील सर्व सेवेकरी तसेच समस्त ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने विकासकामांना गती मिळत आहे.

वडजाई देवी मंदिरासाठी सोलरची सुविधा तसेच गगनगिरी महाराज परिसरातील भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांमुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून, आगामी काळातही आवश्यक विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल दिलीप कदम यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *