दोन वर्षांपासून वडूथ–जरंडेश्वर रस्ता खड्ड्यात; PWDचे ‘निधी नाही’चे कारण!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता आश्वासन नको, रस्ता करून दाखवा; मदन साबळेंचा आंदोलनाचा इशारा

वडूथ | प्रतिनिधी

वडूथ ते जरंडेश्वर रेल्वे स्टेशनपर्यंतचा सुमारे २ कि.मी. रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत खराब असून, वारंवार निवेदने देऊनही PWDकडून प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत विचारणा केली असता ‘निधी उपलब्ध नाही’ असे उत्तर मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

या मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र व जरंडेश्वर रेल्वे स्टेशन असल्याने रुग्ण, रुग्णवाहिका, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला, डॉक्टर-कर्मचारी, प्रवासी तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते. Bharat Forgeमध्ये तीन शिफ्टमध्ये काम करणारे कामगार दिवस-रात्र या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते मदन भिमाजी साबळे यांनी गेल्या दोन वर्षांपासून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

मदन साबळे म्हणाले, “अवघा दोन किलोमीटरचा रस्ता दोन वर्षे प्रलंबित राहणे ही गंभीर बाब आहे. ‘निधी नाही’ हे कारण आता स्वीकारले जाणार नाही. तात्पुरती डागडुजी नको; आवश्यक निधी उपलब्ध करून कायमस्वरूपी नवीन डांबरीकरण करावे. हा रस्ता आता कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजेच. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न आणखी प्रलंबित ठेवला तर लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

आता प्रशासनाने आश्वासन न देता प्रत्यक्ष काम सुरू करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *