राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डी. जी. कॉलेजमध्ये विशेष व्याख्यान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व अधोरेखित

सातारा, दि. २९ ऑगस्ट २०२६ : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय (डी. जी. कॉलेज), सातारा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी श्री. उमेश साबळे सर यांना प्रमुख पाहुणे व प्रमुख व्याख्याते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व जीवनामध्ये खेळाचे असणारे महत्त्व’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

खेळामुळे विद्यार्थ्यांचा केवळ शारीरिक विकास होत नाही, तर त्यांच्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना आणि मानसिक क्षमता विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळालाही आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे मा. डॉ. कुंभार सर होते. प्रमुख पाहुणे श्री. उमेश साबळे सर हे सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य असून राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच म्हणून कार्यरत आहेत.

यावेळी महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे प्रमुख श्री. किशोर संकपाळ सर तसेच श्री. तुषार पवार सर उपस्थित होते.

मेजर ध्यानचंद यांच्या कार्याला अभिवादन

२९ ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन असून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतात हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय हॉकीला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्यात मेजर ध्यानचंद यांचे योगदान ऐतिहासिक आहे. त्यांच्या क्रीडा कारकिर्दीतून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

LIVE महाराष्ट्र 24 | सातारा प्रतिनिधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *