सातारा जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे पोलीस अधिकारी वसंत साबळे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे

पोलीस अधिकारी वसंत साबळे यांचा दरबार हॉल राजभवन, मुंबई राज्यपाल यांच्या हस्ते पोलीस

पदकाने  सन्मान, सातारा जिल्हयाने रचला इतिहास

पोलीस दलामध्ये अति विशिष्ठ सेवेसाठी मार्च २०२२ रोजी अलंकरण समारंभ दरबार

हॉल राजभवन, मुंबई येथे वसंत साबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक से.नि. यांना राज्यपाल

यांच्याहस्ते त्यांगा दुसऱ्यांदा  राष्ट्रपती पोलीस पदक देवून त्यांना गौरविण्यात आले.

वसंत साबळे यांनी सातारा पोलीस दलात सन १९८४ पासून में २०२० पर्यंत ३६ वर्षे

निष्कलंकित सेवा केली. त्यादरम्यान त्यांनी खंडाळा, मेढा , फलटण, कराड, सातारा आणि कोरेगांव

पोलीस स्टेशनला कर्तव्य केले. त्यांनी त्यांच्या सेवाकालावधीत अनेक जून, दरोडे, जबरी चोरी,

खंडणी, महिला अत्याचार, पोक्सो, पिटा, एम.पी.आय.जी. मोक्का वगैरे अनेक कायद्यान्वये कार्यवाही

केली होती. त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी त्यांना ५५० पेक्षा जादा रिवॉर्ड देवून जवळपास

अडीच लाख रुपयांचे बक्षीस रक्कम अदा करण्यात आली आहे. तत्कालिन पोलीस अधीक्षक मिरा

बोरवणकर, सुरेश खोपडे, सी.जी कुंभार, प्रशांत बुरडे, संदीप पाटील,  सातपुते मॅडम  विश्वास

मांगरेपाटील यांनी त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी गौरविले होते. त्यांच्या उत्कृष्ट गुन्हे तपासाबाबत

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही यापुर्वी गौरव केला होता. वसंत साबळे हे पदवीधर

असून त्यांनी कॉम्प्युटर डिप्लोमा, ग्रामीण पत्रकारीतेमध्ये विशेष प्राविण्यामध्ये पदव्या घेतल्या आहेत.

त्यांना यापुर्वी पोलीस महासंचालक यांचे पोलीस पदक, दोन जादा वेतनवाढ भारतरल अब्दुल

कलाम यांचे राष्ट्रपती भेडल प्रदान केलेले आहे. वसंत साबळे हे माजी कबड़ी खेडाळू असून शुटींग

व्हॉलीबॉल खेळामध्ये त्यांच नाव आहे. याशिवाय त्यांनी ४० आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग

घेवून अनेक ठिकाणी त्यांच्या पत्नीसह बक्षीस प्राप्त केली आहेत. अमरावती, गोंदिया तेलंगणा

येथील खुल्या नॅशनल जलतरण स्पर्धेमध्ये त्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेले होते. त्यांच्या वडूथ

lवामध्येही त्यांनी कृष्णा नदीमध्ये जलतरण स्पर्धा घेतल्या होत्या. गावातील शेकडो तरुणांना बरोबर

घेवून धावत जावून भाऊबीज साजरी करुन आरोग्यासाठी नवीन मंत्र दिला होता. सेवानिवृत्तीच्या

दिवशी सातारा ते कोरेगांव असे २१ किलोमिटर अंतर धावत जावून वेगळा उपक्रम राबविला होता.

३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक संभाजी

पाटील यांनी सातारा येथे पोलीस अधिकारी तसेच इतर प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी

यांना विविध विषयावर मार्गदर्शन सुरु केले आहे. विभागीय, प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून ते

काम पहात आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील ७०० ते ८०० अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व सामान्य

लोकांनाही विनामोबदला  मार्गदर्शन करुन त्यांची कामे केली आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध

विषयावर व्याख्यानही देत असतात. त्याशिवाय सध्या वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणूनही काम करीत आहेत.

वसंत साबळे यांना दुसऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अजय

बन्सल, डीवायएसपी किद्रे, डॉ. रणजित पाटील,  जि..सदस्या वनिता गोरे,

किरणनाना साबळे, सरपंच किशोर शिंदे, आबाकोंडी साबळे, मुख्याध्यापक मदनेसर, जलतरण ग्रुप व वडूथ

ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *