वडूथच्या इंग्लिश स्कूलचा रयत प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा, दि. : रयत शिक्षण संस्था यांच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत आयोजित रयत प्रज्ञाशोध परीक्षेत इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, वडूथ या विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच तब्बल पाच विद्यार्थ्यांचीमुलाखतीसाठी निवड झाली असून ही बाब अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे.

महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमधून घेण्यात येणारी ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक मानली जाते. अशा या कठीणपरीक्षेत वडूथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

मुलाखतीसाठी निवड झालेले विद्यार्थी त्यांचे गुण पुढीलप्रमाणे : वेदांत जाधव (१४४), ओंकार मोरे (१४०), श्रेयस वाघमळे (१३८), जीविका साबळे (१३६) अर्पिता साबळे (१३२).

या यशामागे विभाग प्रमुख प्रसाद चव्हाण तसेच मार्गदर्शक शिक्षक श्रीमती एन. टी. शिंदे, एस. टी. सोनवणे, श्रीमती आर. एस. माने श्रीमती व्ही. एस. दरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय अधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ जगदाळे, ज्येष्ठ शिक्षक दिघे, स्थानिकस्कूल कमिटीचे सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदनकरून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *