नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा जिल्हाधिकारी सातारा यांचे नागरिकांना आवाहन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करून आवश्यक समन्वय साधण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ सातारा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

📞 जिल्हा नियंत्रण कक्ष, सातारा

02162-232349
02162-232175
9657521122

प्रशासनाशी संपर्क साधताना संबंधित पर्यटकाचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास देण्यात यावा.

आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. अडकलेल्या नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत.

— जिल्हा प्रशासन, सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *