श्रावणी सोमवारच्या पूर्वतयारीसाठी वडूथमध्ये श्रमदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जि. प. शाळेमागील गटाराची स्वच्छता; श्री शकुंतलेश्वर मंदिर मार्गाच्या साईडपट्ट्यांचे जेसीबीच्या सहाय्याने काम

वडूथ : प्रतिनिधी

श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर वडूथ येथे ग्रामस्थांच्या वतीने श्रमदानातून स्वच्छता व परिसर सुधारण्याचे काम करण्यात आले. जि. प. शाळेच्या मागील बाजूस साचलेला कचरा व माती हटवून गटाराची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होण्यास मदत झाली आहे.

तसेच श्री शकुंतलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्यांचे जेसीबीच्या सहाय्याने काम करण्यात आले. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिराकडे येणाऱ्या भाविकांना रस्ता सुकर व्हावा आणि परिसर स्वच्छ व व्यवस्थित राहावा, या उद्देशाने हे काम करण्यात आले.

सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे काम सुरू होते. दिवसभर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.

हे काम लोकनियुक्त सरपंच शुभांगी मदन साबळे, उपसरपंच अभिजित साबळे, सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे तसेच संजय शिवराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी महेश साबळे, समीर साबळे, बर्गे दादा, अजित साबळे, शशिकांत साबळे यांच्यासह ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.

श्रावणी सोमवारच्या पूर्वतयारीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *