LIVE महाराष्ट्र 24
सत्यमेव जयते…!
संपादकीय कक्ष | ME No. MH26D0230305
२८ सप्टेंबरपासून अवजड वाहतूक बंद; एस.टी., रुग्णवाहिका व हलकी वाहने सुरू राहणार
वडूथ : सातारा–लोणंद मार्गावरील वडूथ येथील कृष्णा नदीवरील तसेच वाढे येथील वेण्णा नदीवरील ऐतिहासिक पुलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाला अखेर ठोस दिशा मिळाली आहे. २५ सप्टेंबर २०२६ पासून या दोन्ही पुलांवरून अवजड वाहतूक थांबविण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. मात्र एस.टी. बस, रुग्णवाहिका आणि हलकी वाहने सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याने नागरिकांची दैनंदिन वाहतूक पूर्णपणे बंद होणार नाही.
या निर्णयासाठी वडूथसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून अनेक निवेदने, पाठपुरावे आणि आंदोलने करण्यात आली होती. पुलांची जुनी रचना, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या, तडे आणि अवजड वाहतुकीमुळे वाढणारा धोका यामुळे नवीन पूल पूर्ण होईपर्यंत सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी सातत्याने होत होती.
सकाळच्या एका दूरध्वनीनंतर हालचालींना वेग
जिल्हा वाहतूक शाखेकडून आवश्यक कार्यवाहीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पत्राची प्रतीक्षा सुरू असल्याचे समोर आल्यानंतर मदन साबळे यांनी २२ सप्टेंबर रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणेचे प्रमुख सचिन गौतम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्हा वाहतूक शाखा पत्राची प्रतीक्षा करीत असल्याची बाब त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
प्रश्नाचे गांभीर्य समजून घेत सचिन गौतम यांनी तातडीने संबंधित पत्र जारी केले. त्यानंतर हे पत्र मदन साबळे यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख विकास धस यांच्याकडे पाठविले. त्यानंतर पुढील कार्यवाहीला वेग आला.
उदयनराजेंच्या सहकार्याचाही उल्लेख
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मदन साबळे यांनी नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. संसदेत व्यस्त असतानाही त्यांनी दूरध्वनीवरून हा प्रश्न समजून घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यास सहकार्य केले. पुलांवरील अवजड वाहतूक रोखताना एस.टी., रुग्णवाहिका आणि हलकी वाहने सुरू ठेवण्याची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनीही या संपूर्ण प्रक्रियेला सहकार्य केले. सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आवश्यक सर्व पाठपुरावा करून संबंधित कार्यवाही व कागदपत्रे सादर केली.
२५ सप्टेंबरपासून अंमलबजावणी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वडूथ व वाढे पुलांसाठी आवश्यक फलक तयार करण्यात आले असून २३ किंवा २४ सप्टेंबरदरम्यान ते बसविण्याची कार्यवाही होणार आहे. तसेच अवजड व उंच वाहनांना रोखण्यासाठी उंची नियंत्रक अडथळे उभारण्यात येणार आहेत.
वाहतूक सुरळीत राहावी आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सातारा जिल्हा वाहतूक शाखेचा पोलीस प्रतिनिधी तैनात करण्यात येणार आहे.
या कामात केसीपीएलचे प्रकल्प व्यवस्थापक दिपेश ठाकूर, अभिषेक हजारी, यादव तसेच केसीपीएलचे समन्वयक निलेश कदम यांच्याकडूनही आवश्यक सहकार्य व समन्वय होत आहे.
पंचक्रोशीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला ठोस दिशा
वडूथचा ऐतिहासिक पूल हा १८४५ पासून वाहतुकीचा साक्षीदार आहे. गेल्या काही काळात पुलांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नवीन पूल होईपर्यंत अवजड वाहतूक नियंत्रित करणे आणि अत्यावश्यक तसेच स्थानिक वाहतूक सुरू ठेवणे, ही नागरिकांची प्रमुख मागणी होती.
या मागणीसाठी मदन साबळे यांनी अनेक वेळा निवेदने देत, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आणि आंदोलनांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. आता २५ सप्टेंबरपासून अवजड वाहतूक रोखण्याच्या निर्णयामुळे पंचक्रोशीतील नागरिकांच्या पाठपुराव्याला ठोस दिशा मिळाली आहे.
या कार्यवाहीबाबत स्थानिक नागरिकांमध्ये “प्रश्न मांडून थांबत नाही, तर काम होईपर्यंत पाठपुरावा करतो” अशी भावना व्यक्त होत असून, नवीन पूल पूर्ण होईपर्यंत नागरिकांची सुरक्षित वाहतूक कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प











Leave a Reply