विकास धस साहेब यांच्या तत्परतेने वाहतूक अवघ्या १० मिनिटांत सुरळीत
सातारा : प्रतिनिधी
सातारा–लोणंद मार्गावर अरळे गावच्या हद्दीत एका ट्रकचा डिझेल टँक तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्याचवेळी सातारा–लोणंद मार्गावरील अवजड वाहतुकीची पाहणी करत असलेले सातारा जिल्हा वाहतूक विभागाचे प्रमुख विकास धस साहेब यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
धस साहेब यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून रस्त्यावर पडलेला डिझेल टँक तातडीने बाजूला करून संबंधित ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला. त्यांच्या या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला आणि वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होण्यापासून बचाव झाला.
त्यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे अवघ्या १० मिनिटांत सातारा–लोणंद मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यावेळी मदन साबळे, सामाजिक कार्यकर्ते, तसेच निलेश कदम यांनीही तातडीने मदत करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले.
घटनेच्या वेळी दाखविलेली विकास धस साहेब यांची तत्परता, प्रसंगावधान आणि जबाबदारीची जाणीव याबद्दल नागरिकांकडून कौतुक व्यक्त करण्यात आले.











Leave a Reply