वडूथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजिंक्य रयत पॅनलचे अभिजित माणिक साबळे यांची बिनविरोध निवड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वडूथ (प्रतिनिधी) :

वडूथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजिंक्य रयत पॅनलचे अभिजित माणिक साबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना अभिजित माणिक साबळे यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यास पुढाकार घेतला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत लोकाभिमुख भूमिका बजावल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर उपसरपंचपदाची जबाबदारी सोपवली.

निवडीनंतर अभिजित माणिक साबळे यांनी ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, “सर्वांना सोबत घेऊन वडूथ गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, युवकांसाठी उपयुक्त उपक्रम आणि मूलभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणार,” अशी भूमिका व्यक्त केली.

यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अजिंक्य रयत पॅनलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिजित माणिक साबळे यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली वडूथ गावाच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *