हल्ल्या मागचा मास्टर माईंड शोधा विनोद कुलकर्णींवरील हल्ल्याचा तालुका पत्रकार संघाकडून तीव्र निषेध

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा -प्रतिनिधी

ऐतिहासिक साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात सुरू असताना, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर तांदूळवाडी येथील संदीप जाधव याने केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा सातारा तालुका पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध केला असून, “केवळ प्रसिद्धीसाठी असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला कायद्याचा असा हिसका दाखवा की पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही,” अशी आक्रमक मागणी सातारा तालुका पत्रकार संघाने केली आहे.

मराठी भाषेचा उत्सव आणि साताऱ्याची शान असलेल्या साहित्य संमेलनासाठी विनोद कुलकर्णी हे गेल्या अनेक महिन्यांपासून अहोरात्र कष्ट घेत आहेत. मात्र, संमेलन सुरू असतानाच, तांदूळवाडी (कोरेगाव) येथील संदीप जाधव याने केवळ ‘चमकोगिरी’ आणि ‘स्टंटबाजी’ करण्याच्या उद्देशाने कुलकर्णी यांच्यावर अनपेक्षित हल्ला केला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
‘मास्टर माईंड’ कोण? आणि हल्ल्याचा कट समोर आला पाहिजे.
हा हल्ला केवळ एका व्यक्तीने केलेला नसून, त्यामागे काही छुपी शक्ती किंवा ‘मास्टर माईंड’ असण्याची शक्यता तालुका पत्रकार संघाने वर्तवली आहे.

“विनोद कुलकर्णी यांच्या परिश्रमातून हे संमेलन यशस्वी होत असताना, जाणीवपूर्वक हा हल्ला घडवून आणला आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ आरोपीला पकडून थांबू नये, तर यामागील सूत्रधाराचा शोध घेऊन त्यालाही कडक शिक्षा करावी,” असे सचिव राहुल ताटे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

संदीप जाधव याच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी साताऱ्याचे आमदार ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सातारकरांच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या अशा प्रवृत्तींना ठेचणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम , उपाध्यक्ष विजय जाधव, सुनील साबळे, शरद पवार, यांच्यासह सर्व सभासदांनी स्पष्ट केले की, जर या प्रकरणात कडक कायदेशीर कारवाई झाली नाही, तर जिल्हा पत्रकार संघाच्या खांद्याला खांदा लावून तालुका संघ ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सज्ज असल्याचा मदन साबळे, सतिश जाधव, प्रमिला साबळे, अमोल बनकर यांनी इशारा दिला आहे.

संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर संदीप जाधवचा हल्ला.
प्रसिद्धीची हाव असलेल्या संदीप जाधव या आरोपीची ही स्टंटबाजी समस्त सातारकरांच्या जिव्हारी लागली आहे. मात्र सातारा पोलीसांनी तत्काळ आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतले असून त्यांनी सखोल चौकशी करून मास्टर माईंड शोधण्याची गरज आहे. अन्यथा पत्रकारांचा संयम सुटल्यास तीव्र आंदोलन आणि जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे खजिनदार वसंत साबळे, …. यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *