कायद्याचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक – अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा-प्रतिनिधी

पत्रकार हे सामाजिक बांधिलकीतून काम करत असल्याने त्यांचा अवमान होऊ नये. पोलीस आणि पत्रकार हे सामाजिक दुवा असून पत्रकारांनी सुध्दा सामाजिक भान ठेवून वृत्तांकन करावे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर यांनी व्यक्त केले.

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी हुज्जत घालत अर्वाच्य भाषेत घातलेला वाद, धमकावले याबद्दल त्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करत सातारा तालुका पत्रकार संघाकडून निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी निवेदनातून मागणी केली आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम उपाध्यक्ष विजय जाधव, सुनील साबळे, कार्याध्यक्ष बाळू मोरे, राजेंद्र साबळे, संतोष यादव, निलेश रसाळ यांच्यासह सभासद पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

अनाधिकृत स्टिकर्स लावलेल्या वाहनांवर होणार कारवाई

आमदार वापरत असलेल्या वाहनांवर स्टिकर्स परवानगी असून अन्य माजी आमदार, सभाप, कार्यकर्ते, कुटुंबातील सदस्यांनी वापरत असलेल्या वाहनांवर स्टिकर्स लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्यांना अधिकृत परवानगी आहे, त्यांनी स्वतः वापरत असलेल्या वाहनांवर स्टिकर्स लावावीत. शिवथर, वाढे येथील दोन आमदारांच्या वाहनांनवर आमदार स्टीकर्स लावलेली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असे अप्पर पोलीस अधिक्षका डॉ. वैशाली कडूकर यांनी यावेळी सांगितले.

चौकट

पोलीस, महाराष्ट्र शासन पाटी ठेवाल तर कारवाई

वर्दी आणि कर्तव्यावर असताना स्वतःच्या वाहनांवर पोलीस पाटी डॅशबोर्डवर ठेवता येईल. मात्र ड्युटीवर नसताना, कुटुंबांतील सदस्यांनी अशी पाटी ठेवल्यास त्या वाहनांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. तर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी पाटी ही अनाधिकृत असून अशा सर्व वाहनांवर आजपासून कारवाई करण्यात येईल, असे अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी यावेळी पत्रकारांना आश्वासन दिले.

चौकट

फिल्मींग, आवाजी साईलंन्सर काढून टाका

डुल्पीकेट साईलंन्सर फिल्मींग यावर सातत्याने क्वचित कारवाई केली जाते. लोकप्रतिनिधी, त्यांच्या कुटुंबीय, प्रमुख कार्यकर्त्यांच्या वाहनांवर डार्क फिल्मींग असलेल्या वाहनांवर कारवाई केली जात नाही, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर डॉ. वैशाली कडूकर यांनी वाहन कंपनीने दिलेल्या काचेवर फिल्मींग करता येत नाही. मात्र कोणी केले असेल तर कोणताही मुलाहिजा न ठेवता थेट कारवाई केली जाईल. अशा वाहन धारकांनी स्वतःहून ते काढावीत. अन्यथा रस्त्यावर यापुढे ते फिल्मींग काढायला लावून कारवाई करणार अशी ग्वाही यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *