केरेगाव – सातारा
सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५डीवर देऊर येथील रेल्वे फाटकाजवळ बेशिस्त वाहनधारकांमुळे आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रेल्वे फाटक बंद असतानाही नियमांचे उल्लंघन करून वाहने पुढे घुसविल्याने महामार्गावर दोन्ही बाजूंनी किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
या वाहतूक कोंडीत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन भिमाजी साबळे हेही अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत बेशिस्त वाहनधारकांना समज देत वाहने बाजूला घेण्यास सांगितले तसेच वाहनांची शिस्तबद्ध रांग लावून वाहतूक मोकळी करण्यास मदत केली.
यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. महेशदादा शिंदे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून बेशिस्त वाहनधारकांना स्पष्ट सूचना दिल्या.
या वाहतूक कोंडीचा फटका प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिकांना बसला. देऊर रेल्वे फाटक परिसरात कायमस्वरूपी उपाययोजना व योग्य वाहतूक नियोजनाची मागणी नागरिकांकडून होत आहे.












Leave a Reply