स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष वडूथ ते सातारा-रोड (पाडळी स्टे.) रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणावर दुरावस्था…..

सातारा  प्रतिनिधी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वडूथ ते सातारारोड डांबर कम खडी जादा कामाचा दर्जा रस्त्याला खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले.

वडूथ ते सातारारोड येथील रस्त्याचे कामकाज बांधकाम विभागातर्फे करण्यात आले होते . पण हे कामकाज अत्यंत निकृष्ट दर्जाचेअसल्याचे येथील नागरिकांना दिसून येत आहे    डांबर टाकताच फक्त खडी टाकून रस्त्याचे काम उरकणार्‍या ठेकेदाराचे पितळ उघडेपडले आहे. डांबर कम खडी जादा कामामूळे अपघातांचे प्रमाण वाढले.


वडूथ ते सातारारोड रस्ता कडे या बांधकाम विभागाचा एक ही अधिकारी  ही फिरकत नाही. बांधकाम विभागाविरोधात आंदोलनकरण्याचा इशारा वडूथ पाडळी , आसगाव करानी दिला आहे.

निकृष्ट रस्ता केला की गेली नोकरी असे नियम केले पाहीजेत
टक्केवारीसाठी अधिकारी कधीच ठेकेदारला बोलत नाहीत. उलट त्याची वकिली करताना दिसतात. यापुढे रस्त्याचे काम निकृष्ट झालेकी अधिकार्‍याला दोषी ठरवून नोकरी गेली पाहिजे. कामाच्या गुणवत्ता, दर्जा राखण्याची जबाबदारी असतानाही अधिकारी फिल्डवरयेत नाहीत. त्यामुळे निकृष्ट काम होत राहणार. रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यासाठी आणि अधिकारी, ठेकेदारावर कारवाईसाठीकायदेशीर दाद मागणार असल्याचे मदन साबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रस्त्याला खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

मदन साबळे

जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा

प्रसाद उंबरदंड

जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *