
दि. १९ : आरळे ते सातारा, वडूथ दरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या पुलावर बंद पडलेले वाहन बाजूला करून वाहतूक कोंडी सुरळीतकरणाऱ्या येथील सामाजिक कार्यकर्त्यांशी स्वतः चुकीच्या दिशेने बोलेरो गाडी वेगाने नेणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपण पोलीसअसल्याचे सांगून अर्वाच्च भाषेत हुज्जत घातल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी ६ वाजता घडला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हापोलीस प्रमुख समीर शेख यांनी कारवाई करावी, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र मंडळाचे अध्यक्ष मदन साबळे यांनीकेली आहे.
सायंकाळी ६ वाजता आरळे ते वडूथ दरम्यान कृष्णा नदीच्या पुलावर एक वाहन बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पुलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही गोष्ट वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे व सहकाऱ्यांच्या लक्षात येतात. त्यांनी पुलावर बंद पडलेले लाल रंगाचे वाहन बाजूला केले. पुलावर वाहतूक कोंडी सुरळीत होत असतानाच
फलटण तालुक्यातील एका साखर कारखान्याची बोलेरो गाडी क्र. एम. एच. ११ डीए– ६५११ ही चुकीच्या दिशेने तेही अतिवेगाने निघालीहोती. वडूथ चौकात फलटण–लोणंदकडे जाणाऱ्या मार्गावर वळण आहे. येथून सातारारोडकडेही एक रस्ता जातो. या चौकात लोकांचीनेहमी गर्दी असते. अशावेळी गतीने व चुकीच्या दिशेने जाणारी बोलेरो गाडी सामाजिक कार्यकर्त्यांनी आडवली. यावेळी गाडीत बसलेलेएक पोलीस कर्मचारी व कारखान्याचे अधिकारी गाडीतून खाली उतरून जमलेल्या लोकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना उर्मटपणे
बोलू लागले. मी पोलीस आहे. कायदा मला शिकवू नका, असे सांगून त्यांनी चुकीच्या दिशेने वाहन चालवूनही आपण पोलीसअसल्याचे अर्विभावात सांगून एकूणच पोलीस खात्याची प्रतिमा डागलण्याचा प्रयत्न केला.
अशा या उर्मट आणि मस्तवाल पोलीस कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी कारवाई करून अशा उर्मट कर्मचाऱ्यांनावरिष्ठ अधिकारी पाठिशी घालत नाहीत, ते शेख साहेब यांनी दाखवून द्यावे, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र मंडळाचेअध्यक्ष मदन साबळे व कार्यकर्त्यांनी केली आहे.











Leave a Reply