पुणे येथे मराठा आरक्षण समितीची बैठक..सर्व दिग्गज एकत्रित येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पुणे : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातून आलेल्या स्थगितीमुळे समाजामध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे त्याचे पडसाद नुकतेच बीडमध्ये एका तरुणाने केलेल्या आत्महत्येच्या रूपाने अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. आरक्षणावरून मराठा तरुणांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण पसरलेले आहे. अशातच शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आमदार विनायक मेटे यांनी ३ ऑक्टोबर (शनिवार) रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संबंधित सर्व मत्त्वाच्या व्यक्तींची पुण्यामध्ये एक बैठक आयोजित केली आहे.

‘मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात एकसूत्रता यावी, यासाठी ३ ऑक्टोबर रोजी (शनिवार) पुण्यात विचार मंथर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये समाजातील माजी न्यायमूर्ती, विचारवंत, संघटनांचे प्रतिनिधी, आरक्षण विषयातील तज्ज्ञ सहभागी होतील,’ असे मेटे यांनी सांगितले. त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

विनायक मेटे यांनी यासाठी खासदार उदयनराजे भोसले तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांना देखील निमंत्रित केले आहे. तसेच यावेळी अनेक दिग्गज वकील,घटनातज्ञ उपस्थित राहणार आहेत. जेणेकरून मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लागू शकेल. त्यामुळे आता या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

ओबीसी नेत्यांना निमंत्रण नाही
मराठा आरक्षणामुळे ओबीसी वर्गात देखील चिंतेचे वातावरण आहे कारण ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण दिले जावे अशी विधाने देखील काही राजकीय नेत्यांनी केली होती. त्यामुळे उद्याच्या बैठकीसाठी ओबीसी समाजाचे कोणी उपस्थित राहणार का ? असा सवाल मेटेंना विचारला असता उद्याच्या बैठकीसाठी ओबीसी नेत्यांना निमंत्रण दिलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *