वन महोत्सवानिमित्त लीड अप इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये २५१ रोपवृक्षांचे वितरण!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वन महोत्सवानिमित्त लीड अप इंटरनॅशनल प्रीस्कूलमध्ये २५१ रोपवृक्षांचे वितरण!

तळेगाव दाभाडे, दि. ०७ जुलै २०२५

शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशन, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने लीड अप इंटरनॅशनल प्रीस्कूलमध्ये वन महोत्सव उत्साहात साजराकरण्यात आला. या उपक्रमांतर्गत “One Child – One Plant” संकल्पनेतून पालकांना २५१ रोपवृक्ष भेट देण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती मिनाक्षी शेलार आणि श्रीमती लिपिका शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनीपालकांशी संवाद साधत वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले.

श्रीमती मिनाक्षी शेलार म्हणाल्या, “ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत आवश्यक आहे. संततुकाराम महाराजांचेवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेआणि संत नामदेवांचेजैसा वृक्ष नेणे याहे अभंग आजही प्रेरणादायी आहेत. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.”

श्रीमती लिपिका शेलार यांनी सांगितले, “वृक्ष संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचे संगोपनकरतो, त्याचप्रमाणे झाडांचेही करणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात तुळस, गवती चहा, अडुळसा, ओवा, आंबेमोहोर यांसारख्या औषधीवनस्पती असाव्यात. या वनस्पती घरगुती उपचारांसाठी उपयुक्त ठरतात आणि आपल्या पूर्वजांनी यालाच आरोग्याचे गमक मानले होते.”

या उपक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती अश्विनी भट यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. श्रीमती पूनम जाधव, श्रीमतीशुभांगी भोसले, श्रीमती विद्या देशमुख, श्रीमती तन्वी शेवकर आणि श्रीमती वंदना पासवान यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचेयोगदान दिले.

या उपक्रमाने पालकांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण होऊन समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *