वरंधा घाटातील दरीत आढळला मृतदेह
भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात 200 फूट दरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे भोर पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध कार्य घेण्यात आले …. एवढ्या खेल दरीत मृतदेह कसा आला याचा शोध पोलीस घेत आहेत …. वय वर्ष 30 ते 35 असल्याचा अंदाज आहे … घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डबडे साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे घटनास्थळी धाव घेतली विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे स्वतः रेस्क्यू टीम सोबत खोल दरीत उतरून शोध आणि तपासणी करत होते … अशावेळी पोलिस ट्रेनिंगचा व गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या कामाचा मोठा उपयोग होतो असे मत psi साबळे साहेब यांनी व्यक्त केले … अथक परिश्रमानंतर सह्याद्री रेस्क्यू च्या मदतीने मृतदेह वरती काढण्यात आला … पोस्टमार्टम साठी मृतदेह भोरच्या सरकारी रुग्णालयात आण्यात आले आहे.. घातपात की आत्महत्या ह्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत













Leave a Reply