सामाजिक बांधिलकी जोपासनारे कॅनफिन होम्स लि. संस्थेच्या चाकण पुणे शाखेचे प्रमुख श्री. प्रदीप साबळे …
दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. १, राम टेकडी, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातकॅनफिन होम्स ltd., चाकण या संस्थेतर्फे सामाजिक उत्तरायित्व निधी (C.S.R.) द्वारे १९ लाख किंमतीची सर्व अत्याधुनिक साधनसामग्री असलेली रुग्ण वाहिका येथील रुग्णालयात सुपूर्द करण्यात आली.
रुग्ण सेवेत येत असलेल्या अडचणी ओळखत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी कॅनफिनहोम्स लि. संस्थेच्या चाकण शाखेचे प्रमुख श्री. प्रदीप साबळे यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या भविष्यकालीन अनेक उपक्रमां संदर्भातहीत्यांनी विस्ताराने माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडंट श्री. संदीप दिवाण यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. रा. पो. दलाचे Assistant कमांडंट दिलीप खेडेकर यांनी केले.
यावेळी कॅनफिन होम्स संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास रा. रा. पो. दलाच्या कर्मचाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे विशेषसहकार्य लाभले.













Leave a Reply