पुणे : शिवजंयतीचे औचित्य साधून पुण्यात दरवर्षी शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजीत स्वराज्य रथ उत्सवात पहिल्यांदाचसहभागी झालेला अंजिक्यतारावीर किल्लेदार मानाजीराव साबळे यांचा रथ आकर्षणाता केंद्र ठरला. स्वत: शिवरायांचे वंशंज छत्रपतीखा. उदयनराजे भोसले यांनी स्वराज्य रथाचे उद्घाटन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे मानाजीराव साबळे किल्लेदार होते. बादशाहाऔरंगजेब यांचा थोरला मुलगा शाहजादा आजम याने अजिंक्यतारा किल्ल्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा किल्लेदार मानाजीरावसाबळे यांनी ताकदीने मुकाबला करुन किल्ला वाचविण्यासाठी शर्तीचा लढा दिला होता. मात्र शत्रूच्या ताकदीपुढे मानाजीराव साबळेयांना या लढाईत वीरमरण प्राप्त झाले होते. मानाजीराव यांच्या शौर्याबद्दल शिवरायांनी त्यांचा जिजाऊ आईसाहेब यांच्या हस्ते ताम्रपटव जहागीर देवून सन्मान केला होता. अशा मानाजीराव साबळे यांच्या वंशांजांच्यावतीने प्रथमच शिवजयंतीचे औचित्य साधून स्वराज्यरथ काढण्यात आला होता. विशेष म्हणजे शिवरायांचे वंशंज छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी स्वराज्य रथाच्या उद्घाटनसोहळ्यासाठी उपस्थित राहिले व त्यांनी साबळे कुटुंबियांचा गौरव केला. या रथ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह विविध राज्यांमधील हजारोसाबळे कुटुंबियांसह परिवारासह सहभागी झाले होते.













Leave a Reply