उपनिरीक्षक राहुल साबळे यांची दबंग कामगिरी बेरोजगार तरुणांना गंडा घालणाऱ्यास मुंबईतून अटक

FullSizeRenderतरुणांना गंडा घालणाऱ्यास मुंबईतून अटक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भोर दि.२२

तालुक्यातील चिखलगाव आणि परिसरातील ८५ युवकांना पोस्टात नोकरी लावण्याच्या बहाण्याने १९ लाख ७० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला भोर पोलिसांनी दादर,मुंबई येथील कोळीवाडा परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.ज्ञानेश्वर शिवाजी वरे रा.वरवडी ता.भोर असे त्याचे नाव असून त्याच्याकडून मारुती सुझुकी कंपनीची एक चारचाकी मोटार,मोबाईल संच याचा एकत्रित ५ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी निलेश तानाजी तावरे रा.चिखलगाव ता.भोर यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.आरोपी ज्ञानेश्वर वरे नोव्हेंबर २०२१ पासून फरार होता तसेच सध्या त्याने त्याचा मोबाईल बंद ठेवल्याने तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांचे समोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र आरोपीने नोव्हेंबर २०२१ मध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावरून स्विगी कंपनी मार्फत जेवण मागविल्याचे तपासात उघड झाले आणि चाणाक्ष पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी हीच गोष्ट नेमकी हेरली.आरोपी गुजरात मार्गे राजस्थान येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मध्यरात्री दीड वाजता सापळा रचून वरवडी येथील भामट्याला दादर,मुंबई येथील कोळीवाडा परिसरातून ताब्यात घेतले आहे.पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल साबळे,सहायक फौजदार अशोक खुटवड,पोलीस हवालदार यशवंत शिंदे,अविनाश निगडे, वर्षा भोसले,पोलीस नाईक शौकत शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *