“मराठा समाजा आता मातोश्रीवर आंदोलन करणार”
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाला आलेल्या स्थगिती नंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज राज्यभर रस्त्यावर उतरून आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व पोलीस भरती स्थगित करण्यासाठी राज्य सरकारला अनेक वेळा सागितले आहे परंतु राज्य सरकारने अद्यापि त्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्यामुळे मराठा समाज येत्या ६ तारखेला मातोश्रीच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं आज कोल्हापूर येथून मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले या पत्रकार परिषदेमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा चे समन्वयक आबासाहेब पाटील व मराठा क्रांती मूक मोर्चा चे दिलीप पाटील व सचिन तोडकर प्रवीण पाटील उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारला सोमवार पर्यंत चा अल्टिमेटम दिला आहे जर सोमवार पर्यंत लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द न केल्यास मातोश्री या मुख्यमंत्री याच्या निवासस्थाना बाहेर मराठा समाज ठिय्या आंदोलन करेल व राज्यातील सर्व युवक हे या आंदोलनामध्ये सहभागी होतील असा इशारा मराठा समाजाच्या वतीने आज कोल्हापुरात देण्यात आला.












Leave a Reply