कोल्हापूर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेली पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघाची विधानपरिषद निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. याबाबत दोन दिवसात अधिकृत घोषणा होणार आहे. निवडणूक लवकर होणार नाही या भ्रमात असणाऱ्या इच्छुकांना याची कुणकुण लागताच सारे अचानक चार्ज झाले आहेत. पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी ते एकदम सक्रिय झाले असून ही निवडणूक महाविकास आघाडी विरोधात भाजप अशीच रंगणार आहे.
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सलग दोनवेळा येथून विजयी झाले. या पक्षाची हॅट्रिक साधण्यासाठीक्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांचे नाव सध्या या पक्षाच्यावतीने आघाडीवर आहे. शिक्षक मतदारसंघासाठी भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेने जितेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपता ही जागा काँग्रेसला मिळणार असून या पक्षाच्या उमेदवारीसाठी सुजाता माळी, दादासाहेब लाड यांच्यासह अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यमान आमदार सावंत देखील रिंगणात उतरणार असून टीडीएफ व कृती समितीच्या उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या पक्षाकडून इच्छूकांची यादी मोठी आहे. या पक्षाची उमेदवारी पुणे जिल्ह्यात मिळणार की कोल्हापूर एवढीच आता उत्सुकता आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक लढणार असून राष्ट्रवादीला ही जागा मिळणार हे निश्चित आहे.
गणेश काटकर यांनी ही निवडणूक लढवणार असे जाहीर केले असून निवडणूक लढणारच अश्या प्रकारे त्यांनी गेल्या अनेक दिवसात पश्चिम महाराष्ट्र मध्ये सर्व पदवीधर युवकांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे राजकीय पक्षाच्या अनेक नेत्याच्या कडे उमेदवारी साठी त्यांनी जोर लावलेल आहे परंतु वेळ पडली तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केलं आहे.
क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांचे नाव सध्या या पक्षाच्यावतीने आघाडीवर आहे. शिक्षक मतदारसंघासाठी भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेने जितेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपता ही जागा काँग्रेसला मिळणार असून या पक्षाच्या उमेदवारीसाठी सुजाता माळी, दादासाहेब लाड यांच्यासह अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यमान आमदार सावंत देखील रिंगणात उतरणार असून टीडीएफ व कृती समितीच्या उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.












Leave a Reply