अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाला मुदतवाढ द्या दिलीप पाटील याची मागणी.
राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ पश्चिम, महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण शेतीचे पीक वाया गेले अशा परिस्थितीमध्ये शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसाया चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातून आता सावरण्यासाठी दिलासा देण्याची आवश्यकता आहे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी आक्रमक मागणी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक दिलीप पाटील यांनी नरेंद्र पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली दिलीप पाटील व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या पत्रामध्ये अनेक मागण्या केलेल्याआहे ज्या शेतकऱ्यांचे शेती पूरक व्यवसायासाठी (ट्रॅक्टर पोल्ट्री फार्म दुग्ध व्यवसाय शेळीपालन व इतर सर्व) यासाठी बँकेतून कर्ज घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे व्याजाचा परतावा मिळत होता त्यांना आता या नुकसानीमुळे बँकेचा हप्ता भरणे शक्य नाही; तरी आपण याबाबत सर्व कायदेशीर पूर्तता करून शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता भरण्यासाठी व व्याज परताव्यासाठी कमीत कमी एक वर्षाची मुदतवाढ द्यावी त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल.
ज्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना अग्रक्रमाने नवीन शेतीपूरक उद्योग उभा करण्यासाठी त्वरित महामंडळातर्फे ग्रुप कर्ज वाटप व वैयक्तिक व्याज परताव्याचे एल.ओ.आय. द्यावे.
हे केल्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही तरी सुद्धा पीडितांसाठी काही प्रमाणात दिलासा मिळेल. अशी मागणी दिलीप पाटील यांनी नरेंद्र पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली नरेंद्र पाटील हे मराठा समाजासाठी आणि विशेषता शेतकऱ्यांसाठी खूप महामंडळाच्या माध्यमातून चांगले निर्णय घेतात त्यामुळे अशाच प्रकारचा निर्णय ते मराठा युवकांसाठी व शेतकऱ्यांसाठी योग्य प्रमाणात घेतील अशी मराठा समाजाच्या समन्वयकांना यांच्याकडून अपेक्षा आहे असेही दिलीप पाटील म्हणाले मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक
बापू क्षीरसागर विरेन पवार नानासाहेब जावळे
गणेश काटकर रामदास शेलार प्रवीण पाटील
भागवत कदम उमेश शिर्के शरद काटकर
रवी मोहिते साइराज कदम विवेक कुराडे
सुनील बाप्पा मोरे अभय पाटील अभिजित पाटील
हुकूम तुरके पाटील किशोर चव्हाण पंकज घाग
व्यंकटेश कदम अजित पाटील धनंजय माने (पाटील)
सचिन तोडकर जगन्नाथ काकडे, अप्पा कुडेकर
करण गायकर धनंजय जाधव सतीश वेताळ
तुषार काकडे प्रवीण पिसाळ सूचेता जोगदण्ड पाटील
डॉ. अभय पाटील शिवानंद भानुसे राजन घाग
विलास सुद्रीक सतीश डोंगरे तुषार जगताप
प्रफुल पवार रुपेश मांजरेकर वेंकट शिंदे
रुपेश कदम धनाजी सावंत संदीप नवघणे
नितीन पवित्रकार सुहास सावंत नितीन पाटील
गोरख दळवी स्वप्नील पार्टे अनिरुद्ध शेलार इत्यादी समन्वयकांनी मागणी केली.












Leave a Reply