कोल्हापूर:- मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिल्या नंतर आज राज्यभर मराठा समाजाने पुढील रणनीती साठी जिल्हा स्थरिय बैठका घेतल्या परंतु राज्यात आज अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक होऊन सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले आज कोल्हापूर मध्ये राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रकार केला गेला त्या वेळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्या वेळी आंदोलन कर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा दिल्या. शेकडो कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली या वेळी मराठा आरक्षण याचिकाकर्ते दिलीप पाटील व व स्वाभिमानी सगटनेचे जिल्हा अध्यक्ष व मराठा समन्वयक सचिन तोडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या वेळी दिलीप पाटील यांच्या बरोबर संपर्क केला असताना ते म्हणाले जर सरकारने एक आठवड्यात आम्हाला आरक्षण दिले नाही तर या पुढे तीव्र आंदोलन करू आणि मुंबई ला जाणारा दूध पुरवठा रोखला जाईल . सचिन तोडकर म्हणाले या पुढे सरकारने मराठा समाजाला अजिबात फसवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा त्याचे परिणाम खूप वेगळे होतील असा सरकारला इशारा दिला त्याच बरोबर आज सोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले तर या आक्रमक आंदोलना नंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
मराठा समाजाला न्याय मिळणारच. हे आपलं सरकार आहे मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मराठा समाजाने आपल्या सरकारविरोधात मोर्चे काढू नयेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोल्हापूर मध्ये मराठा समाज आक्रमक दिलीप पाटील व सचिन तोडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात












Leave a Reply