शरद पवार गेली 50 वर्ष राजकारणात,सलग 15 वर्ष राज्यात सरकार असुनही मराठा आरक्षण का दिले नाही?-चंद्रकांत पाटील
मुंबई:कोरोना संकट राज्यात पाय पसरत आहे त्यावर राज्य सरकार आळा घालण्याचा प्रयत्न करत असताना राज्य सरकार समोर कोरोना व्यतिरिक्त इतर अडचणींना तोंड दयावे लागत आहे.सुशांतसिंह राजपूत आत्महत्या असेल किंवा कंगणाच्या ऑफिस वरील कारवाई असले या दोन्ही मुद्यावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठत असतानाच आता सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्या नंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.या वरून सरकारला सात दिवसांचा अलटीमेटम मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी सरकारला अरक्षणावरून चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळत आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यदेशाचा पर्याय सुचवला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. “शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. आता अध्यादेश काढणं म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे, असंही ते म्हणाले. एका खाजगी वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमा दरम्यान पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात मोठा निर्णय देत महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. शिवाय हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या विस्तारित खंडपीठाकडे सोपवलं. या निर्णयामुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण वगळता नोकरी आणि इतर शैक्षणिक आरक्षणाला तूर्तास स्थगिती मिळाली. याविषयी बोलताना शरद पवार यांनी अध्यादेशाचा पर्याय सुचवला. सोबतच यासंदर्भात कायदे तज्ञांचं काय मत लक्षात घ्यायला हवं असंही म्हटलं.
यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, “शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही. सलग 15 वर्षात राज्यात तुमचं सरकार होतं. तुम्ही स्थापन केलेल्या बापट समितीने मराठा समाजाला मागास म्हटलं होतं.
Related















Leave a Reply