राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्याला दसरा-दिवाळी पूर्वी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे छत्रपती युवा सेनेने केली मागणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्याला दसरा-दिवाळी पूर्वी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा

कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे छत्रपती युवा सेनेने केली मागणी

छत्रपती युवा सेना संघटनेच्या वतीने आज कृषी मंत्री दादा भुसे यांना संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या बाबत चर्चा करण्यात येऊन निवेदन देण्यात आले

या निवेदनात संपूर्ण राज्यात प्रचंड अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे तसेच शेतकऱ्याकडील मागील कर्जवसुली थांबविण्यात येऊन नवीन कर्ज शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात तात्काळ उपलब्ध करुन द्यावे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेले आहे त्या शेतकऱ्यांना सरकारने जमीन उपलब्ध करून घेऊन शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचे काम करावे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय करावी तसेच जे माणसे मृत्युमुखी पडली त्या कुटुंबाला पाच लाखाची मदत आणि पशुधन होणारे नुकसान भरपाई मिळावी तसेच जिरायती बागायती आणि फळ भागांचा योग्य मोबदला हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ देण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन छत्रपती युवा सेना पदाधिकाऱ्यांनी भेटून दादा भुसे यांना दिले राज्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात चर्चा करून वरील निर्णय सरकारने तात्काळ घ्यावे असे विनंती आव्हान करण्यात आले

यावेळी छत्रपती युवा सेना प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष पुष्पाताई जगताप प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अण्णासाहेब खाडे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक जाधव चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आनंद बच्छाव प्रदेश उपाध्यक्ष संतोष टिळे जिल्हा कार्याध्यक्ष मयुर दाते जिल्हाप्रमुख तुषार भोसले जिल्हा संघटक गणेश जाधव महानगरप्रमुख यश बच्छाव महाराष्ट्र कामगार सेनेचे महानगर प्रमुख तुषार जगधाने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *