म्हसवड श्री.सिद्धनाथ यात्रेसाठी म्हसवड पोलिसांकडून दमदार नियोजन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

माण खटाव प्रतिनिधी :धनंजय माने पाटील 

दि.17   म्हसवड श्री. सिद्धनाथ यात्रेचा मुख्य दिवस दि.24 रोजी असून दरवर्षी यात्रेसाठी लाखो भाविक येतात, ही बाब लक्षात घेऊन यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून म्हसवड पोलिसांकडून दमदार नियोजन केल्याची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि राजकुमार भुजबळ यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पोळ पेट्रोलपंप, माळशिरस चौक, मार्केटयार्ड, खासबागेमळा, दहिवडे वस्ती, झगडे वस्ती, या ठिकाणी सर्व भाविकांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आदल्या दिवशी मुक्कामी येणाऱ्या सासनकाट्या यांची बाजारपटांगण म्हसवड या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच बाजार पटांगण शेजारील गाळ्याच्या पाठीमागे त्यांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दि. 24 नोव्हें. रोजी मा. नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांनी पेट्रोलपंप बंद ठेवून यात्रेकरुच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात एसटी स्टँड उभारणी करता जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर यात्राकालावधीत बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सिद्धनाथ विद्यालय म्हसवड यांनी तीन खोल्या देऊन तसेच कोविड सेंटर इमारत नंबर तीन देऊन श्री.जंगम सर यांनी पूर्णतः सहकार्य केले आहे.

तसेच यात्राकालावधीत म्हसवड शहरांमध्ये पाकीटमार, साखळीचोर,या जनजागृती बाबत अहिंसा नागरी पतसंस्था, माणगंगा शैक्षणिक संस्था, किरण मोबाईल शॉपी म्हसवड यांनी मोठे फ्लेक्स करता सहकार्य केलेआहे. त्याचबरोबर स्वयंसेवकांना टी-शर्ट सौजन्य धनाजी माने मा. नगरसेवक यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.

त्याचबरोबर यात्रेच्या मुख्य दिवशी पर्याय रस्ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, बेशिस्त वाहनचालकांच्यावर दंडात्मक  कार्यवाही करणार असल्याबाबत  माहिती देण्यात आली आहे. 

दिघंची, झरे, आटपाडीकडून  येणाऱ्या वाहनासाठी वीरकरवाडी चौक ते नागोबा मंदिर ते कुकुडवाड रस्ता असा बायपास ठेवण्यात आलेला आहे. सातार वरून पंढरपूर कडे जाणाऱ्या वाहनासाठी पोळ  पेट्रोलपंप शेजारून खांडेकर तालीम भाटकी रोड भाटकी चौक भाटकी गाव ते माळशिरस रोड असा पर्याय रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दोन चाकी वाहना करता शिंगणापूर चौक ते युवराज सूर्यवंशी यांचे निवासस्थान ते शिक्षक कॉलनी ते पोलीस स्टेशन रोड असा पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात आला आहे.

त्याचबरोबर म्हसवड पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात आले आहे की, यात्रेच्या मुख्य दिवशी मोठ्या वाहनांचा म्हसवड शहरातील लोकांनी वापर करू नये.
मुख्य रस्त्यावर आपल्या दारात उभा असणारी वाहने शहराच्या बाहेर लावण्यात यावीत.

पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार, सर्व पोलीस पाटील, होमगार्ड, स्वयंसेवक, सेवाभावी संस्थेचे सेवक, पोलीस मित्र, इत्यादी सर्व बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. सिद्धनाथ मंदिर परिसर व यात्रा पटांगण या ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेले आहेत. अशी माहिती म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार भुजबळ यांनी दिली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *