श्रेयस इंग्लिश स्कूल मुळे ग्रामीण भागातील उद्याची पिढी उन्नत होईल -अनुराधा देशमुख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अनुराधा देशमुख यांच्या हस्ते श्रेयस इंग्लिश स्कूलचा उदघाट्न सोहळा संपन्न

प्रविण राजे
दहिवडी प्रतिनिधी

राणंद( ता. माण )येथे सोमवारी श्रेयस इंग्लिश मीडियम स्कूल चा उदघाट्न सोहळा सौ. अनुराधा देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी देशमुख बोलताना म्हणाल्या आजची मुले ही उद्याचे भविष्य आहेत. मात्र ग्रामीण भागातील मुले शिक्षणाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने मागे पडत आहेत. पण राणंद सारख्या ग्रामीण भागात सुरु झालेल्या श्रेयस इंग्लिश स्कूल मुळे लहान विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उन्नती साठी नक्कीच चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. देशमुख पुढे बोलताना म्हणाल्या सौ. रुपाली दत्तात्रय जगदाळे यांनी समाजातील उद्याची पिढी घडविण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. तसेच छोट्या व मोठया गटातील मुले ही खूपच लवकर आपल्या शैक्षणिक जीवनात प्रवेश करतात त्यामुळे शाळेमध्येही त्यांना शिक्षणाबरोबर आईचे मायेने संस्कार करत वाढवले जावे अशी आशा व्यक्त केली.
श्रेयस इंग्लिश मिडीयम स्कूल च्या संस्थापक सौ रुपाली जगदाळे बोलताना म्हणाल्या ज्या समाजात आपण राहतो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो याच संकल्पनेतून श्रेयस इंग्लिश स्कूल उदयास आली. माण तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लहान मुलांचे आईवडील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात कष्ट करत असतात मात्र यामुळे त्यांना आपल्या मुलाकडे पुरेसा वेळ देता येत नाही. ग्रामीण भागातील आईवडिलांना ही वाटते माझा मुलगा, मुलगी ने मोठ्या शाळेला जावे सध्याच्या बदलत्या युगात त्याने पाठीमागे राहू नये. पण फक्त जवळपास आधुनिक शिक्षणाची वं इंग्लिश मिडीयम ची सोय नसल्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहते. म्हणूनच मी ग्रामीण भागात इंग्लिश मिडीयम शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याची सुरवात होत आहे. श्रेयस इंग्लिश स्कूल च्या माध्यमातून बालकांसाठी जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढे करू अशी ग्वाही ही सौ रुपाली यांनी दिली
यावेळी कार्यक्रमास अमरदीप आपगे (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग), मुख्याध्यापिका सौ विद्यावती पन्नूरे, दत्तात्रय जगदाळे,सूर्याची राव जगदाळे संचालक सातारा जिल्हा खरेदी विक्री संघ, मुरलीधर शिंदे, समिंद्र जगदाळे, नितीन सावंत
,संजय नारायणे उमेद प्रभाग प्रमुख
,प्रगती शिंदे,संध्या शिंदे, तुकाराम शिंदे विकास सेवा सोसायटी सचिव, उमेश गायकवाड (सोसायटी सचिव),एडवोकेट गणेश बेहरे,अक्षय जगदाळे सातारा जिल्हा जाॅईंट सेक्रेटरी आंतरराष्ट्रीय मानवधिकार सामाजिक न्याय आयोग, रोहन भोसले , किरण फडतरे आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *