जरंडेश्वर रेल्वे स्टेशन वडूथ येथील रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे अर्धवट काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे काम यामुळे वडूथआसगाव येथील रेल्वे पुलाखाली  पाणीसाठते.सतत अपघात होत असून तत्काळ येथील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलनचा इशारा वडूथ,आसगावकरांनी दिला 

गेली १३ महिन्यांपासून जरंडेश्वर रेल्वे स्टेशन जवळ वडूथ ,आसगाव रस्त्यावर नव्याने पुलाचे बांधकाम अर्धवट आहे.या पुलाचे बांधकामकरणाऱ्या अभियंत्याने आणि ठेकेदाराने घाईघाईत काम करताना अनेक चुका केल्या, निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पहिल्याच पावसातअनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.यात पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साठते आहे.यामुळे दुचाकी वाहनधारकांना कसरत करावीलागते. अनेक जण घसरून पडतात.याबद्दल रेल्वे प्रशासनाला कळवले, भेटायला गेलेल्या स्थानिकांचे ऐकून हि घेतले जात नाही.यामुळेचिडलेल्या स्थानिक नागरिकांकडून अचानक रेल रोको आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे

याबाबत मदन साबळे यांनी रेल रोको आंदोलनाची माहिती दिली.या वर  रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न,त्याचीगंभीरता, ठेकेदार आणि अभियंता सिंग यांच्या असहकार्य बाबत तक्रार करू

चौकट

जिथे चुकीचे तिथे मदन साबळे राहतात उभे

वडूथ परिसरातील कोणताही प्रश्न, अडचण आली की स्थानिक नागरिकांकडून सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांच्याशी संपर्क केलाजातो. खासदार .उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले मदन साबळे हे अभियंता असून वडूथ,आरळे पुलाचे काम, मुख्यरस्त्याचे काम सुरू असताना पुर्णवेळ लक्ष ठेवून होते. सातारा रोड ते वडूथ रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना ते निकृष्टदर्जाचे होत असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पाॅटवर बोलवून काम बंद पाडले. रेल्वेच्या पुलाच्या कामामुळे अनेक त्रासहोत असताना अधिकाऱ्यांना याविरोधात रेल्वे प्रशासनाला भेटून माहिती दिली.तरीही दखल घेतली गेल्याने रोको आंदोलनाचे नेतृत्वकरण्यासाठी तयारी केली आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *