छत्रपतींच्या घराण्याची बदनामी खपवून घेतली जाणार नाही:
छावा क्षात्रवीर सेना,
मराठा आरक्षणा संदर्भात दि. 07/10/2020 रोजी नवी मुंबई येथे पार पडलेल्या मराठा समाजाच्या राज्य स्तरीय बैठकीच्या अनुषंगाने मराठी वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देताना गुनरत्न सदावर्ते यांनी हिन वृत्ती चे प्रदर्शन करत छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी अपशब्द वापरले. (लाचार) सारख्या तिरस्कारयुक्त शब्द वापरत त्यांची अफझलखानाशी तुलना केली.
मराठा समाजाने आपल्यावर होणार्या अन्याया विरुद्ध संविधानिक मार्गाचा वापर करून समाज हिताला कुठेही बाधा न पोचवता लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल मराठा समाजाने कोणतीही असंविधानिक प्रतिक्रिया न देता न्यायालयीन लढा पुढे सुरू ठेवत संयमाने घेतला. परंतु
गुनरत्न सदावर्ते यांची तत्कालीन प्रतिक्रिया आसुरी आनंद अशीच होती. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याचा विजयी उन्माद सदावर्ते व्यक्त करत होते. आजच्या बैठकीच्या अनुषंगाने छत्रपतींवरील त्यांची प्रतिक्रिया मराठा समाजाच्या भावना दुखावनारी आहे. याचा आम्ही निषेध करतो. वारंवार संविधानाचा दाखला देत छत्रपतींची अवहेलना करण्यामागे सदावर्ते चा हेतू निश्चित शुद्ध नाही. ते ज्या संविधानाचा उल्लेख करतात ते कुणा एकाच्या बापाची जहागीरी नाही ते संपूर्ण देशाचे आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो परंतू त्याच्याआड छत्रपतींच्या घराण्याची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारची विधाने निश्चित असंतोष उत्पन्न करतात. मराठा समाजातील असंतोष दिवसेंदिवस वाढत असताना अशी निर्बूध्द विधाने करून, आरक्षण विरोधी फुत्कार सोडून मराठा समाजाच्या संयमाचा निश्चित उद्रेक होईल. अशा अपप्रवृत्ती चा शासनाने बंदोबस्त करावा, अन्यथा छावा क्षात्रवीर सेने मार्फत करणेत येईल तो पण संविधानिक मार्गाने.
नाााााााााााााााााााााााााााााााााा











Leave a Reply