नाशिक : नाशिक मध्ये शनिवार दि.२६ सप्टेंबर २०२० रोजी छञपती खा.संभाजीराजे,ना.नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सकल मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय समन्वयक बैठक पार पडली.या बैठकीत सर्व जिल्ह्यातील समन्वयकांनी आपआपल्या जिल्ह्यातील भुमिका मांडली.कायदे तज्ञांनी झालेल्या चुकांचा आढावा घेऊन भविष्यातील कायदेशीर रणनिती समजावून सांगितली.या बैठकीतील साधकबाधक चर्चेनंतर काही ठराव मंजूर करून नजिकच्या काळातील कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला.जे या बैठकीतस हजर राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी हे ठराव आणि कृती कार्यक्रम देत आहोत.
सकल मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य
लक्षवेधी ठराव :
( महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणावर आलेल्या सुप्रीम कोर्टातील स्थगिती ला लवकरात लवकर उठवून मराठा समाजाला आरक्षण पूर्ववत करणे.
१) इडब्लूएसमध्ये मराठा समाजाला देऊ केलेले आरक्षण मान्य नाही…
२) कोपर्डीच्या ताईला न्याय देण्यासाठी आरोपींना तात्काळ फाशी द्या…
३) सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत राज्य शासनाने कुठल्याही विभागात भरती प्रक्रीया राबवू नये.
४) मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक आणि तरूणांवर दाखल असलेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेणे..
५) सन २०१९ मध्ये एमपीएससी मध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करणे
६) राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठा समाजासाठी १२% जागा वाढवून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी..
७) राज्य शासनाने राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे एसइबीसी प्रवर्ग १०२ घटनादुरूस्तीनुसार नोटीफाय करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा..
८) राज्यशासनाने केंद्रशासनाला राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करून पन्नास टक्क्यांची मर्यादा रद्द करण्यासाठी विनंती प्रस्ताव पाठवावा.”
९) केंद्र सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीत मोर्चा काढण्यात यावा.
१०) सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छञपती संभाजी राजे यांची नियुक्ती करावी, सारथीला एक हजार कोटीचा निधी द्यावा..
११) राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत वाढीव जागांची तरतूद (सुपर न्युमररी) करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करावी.
१२) सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणाऱ्या जेष्ठ वकीलांना ब्रिफींग करण्यासाठी सुचवलेल्या वकीलांची समिती तात्काळ गठीत करण्यात यावी.
१३) मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी.
१४) महाराष्ट्रात १० आॕक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाशी महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नाही.
…….
*कृती कार्यक्रम:*
१)येत्या २ ऑक्टोबर खासदार आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणे.
२) येत्या ५ ऑक्टोबर महाराष्ट्रातील प्रत्येक तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे.
३) प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत मराठा क्रांती मोर्चाने अधिकृतरित्या दिलेले निवेदन जिल्हाधिकारी (शासन) यांना द्यावे.












Leave a Reply