मंत्री अब्दुल सत्तार यांची तरुणाला शिवीगाळ? तरुणाने मराठा आरक्षणावरून विचारला होता प्रश्न.
मंत्री अब्दुल सत्तार यांची तरुणाला शिवीगाळ? तरुणाने मराठा आरक्षणावरून विचारला होता प्रश्न.
शिवसेनेचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथे आले होते.
त्यावेळी एका शेतकरी मराठा तरुणाने मराठा आरक्षण आणि शेतकरी मदत याविषयी प्रश्न विचारला. मात्र प्रश्नाचे उत्तर न देता सदर भगवान जीवरग या तरुणाला अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसा विडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे अनेक मराठा तरुणांची माथी भडकली आहेत.
अब्दुल सत्तार यांनी अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पैसे घेऊन प्रश्न विचारतो का असा प्रतिसवाल विचारला. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.












Leave a Reply