हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी ढोल बजाओ आंदोलन, मराठा पुन्हा आक्रमक

    1. मंगळवारी ढोल बजाओ आंदोलन,
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

हिंगोली / प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभुमीवर पुन्हा एकदा मराठा समाज एकवटला असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाभरात २९ सप्टेंबर रोजी ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबाबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव तहसील कार्यालयासमोर व हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे. असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे. सदरील बैठकीत राज्य शासनाने जाहीर केलेली पोलीस भरती थांबवून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये, अशी चर्चा करण्यात आली. या बैठकीला वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी आदी ठिकाणावरून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, स्वयंसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *