मराठ्यांची शोकांतिका की फसवणूक
मागच्या सरकारने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याऐवजी मराठा समाजास ५०% च्या वरचे आरक्षण दिल्याने ते न्यायालयात अडकले.खरं तर ओबीसी आरक्षणाचा आधीपासून लाभ घेणार्या जातींचा रोष येऊ नये म्हणून पळवाट काढीत मराठा समाजास ओबीसीत आरक्षण न देता ५०%च्या वरचे १६% आरक्षण दिले गेले.
वास्तविक मराठा समाज सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे खत्री आयोग,बापट आयोग,राणे समिती व इतर अनेक पुराव्यांच्या आधारे निर्विवाद सिद्ध झालेले आहे.याआधारे मराठा समाजास ५०%च्या आत अगदी स्वतंत्र गट करून जरी ओबीसीत आरक्षण दिले असते तरी ते रास्त व टिकाऊ ठरले असते.परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाज तेव्हढा मोठ्या प्रमाणात जागरूक नसल्याने त्याचा मताच्या रूपाने तेव्हढा फायदा होणार नाही.उलट मराठ्यांना ओबीसीत घातल्याने आधीचा ओबीसी विरोधात गेला तर तोटा होण्याचीच भिती आधीच्या व आत्ताच्याही सत्ताधार्यांना वाटतेय.म्हणूनच सत्ता कोणाचीही असली तरी मराठा समाज ओबीसी आरक्षणास कायदेशीर दृष्ट्या पात्र ठरत असूनही न्याय्य निर्णय घेतला जात नाही व घेतला जाणारही नाही.याला एकच पर्याय आहे तो म्हणजे मराठा आरक्षण जनआंदोलनाचा.तळागाळातून मराठा समाज जागृत करून लाखो,करोडोंच्या संख्येने मराठा रस्त्यावर उतरला तर मराठ्यांच्या मताची ताकद प्रभावी ठरण्याची भिती राज्यकर्त्यांना वाटेल.आणि मग सत्ता वाचविण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी राज्यकर्त्यांना मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यचा निर्णय घ्यावाच लागेल.
मराठा समाजाचं कायदेशीर दृष्ट्या परिपूर्ण असं संख्येचं आंदोलन उभे रहावे यासाठी नियोजनबद्ध,दिर्घकाळ व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न करण्यापेक्षा मोठमोठ्या डरकाळ्या फोडून मराठ्यांची फरफट करायची व मराठा आरक्षणा आडून राजकीय आरोप-प्रत्यारोप करीत वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधायचा असेच उद्योग होत आले आहेत.याला मराठा समाजाची शोकांतिका म्हणायचे कि फसवणूक? म्हणून मराठ्यांनी यापुढे तरी भूलवणारी,झुलवणारी भाषा ओळखावी व मगच अनुनय करावा अन्यथा आहेच येरे माझ्या मागल्याची तिच गत पुन्हा पुन्हा! जय मराठा जय शिवराय!
–इंजी.संजीव भोर पाटील, निमंत्रक मराठा आरक्षण जनआंदोलन महाराष्ट्र तथा संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य.मो.९९२१३८११८१












Leave a Reply