२५ सप्टेंबर ला देशव्यापी आंदोलन…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

केंद्र सरकारने सादर केलेले 3 कृषी विधेयकं आज लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाले. या तिन्ही नव्या कायद्यांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत (Farmer Organization oppose New agricultural law). “बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारं, बाजार समित्या उद्ध्वस्त करणारं, सरकारची जबाबदारी कमी करणारं आणि शेतीसह शेतकऱ्याला कॉर्पोरेट घराणे, कंपन्या, दलाल आणि प्रक्रियादारांच्या दावणीला बांधणारे कायदे सरकारने केले आहेत,” असं मत किसान संघर्ष समितीचे नेते अजित नवले यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी या कायद्यांविरोधात देशभरातील 208 शतेकरी संघटना 25 सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करणार असल्याची माहितीही दिली.

अजित नवले म्हणाले, “बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारं, बाजार समित्या उद्ध्वस्त करणारं, सरकारची जबाबदारी कमी करणारं आणि शेतीसह शेतकऱ्याला कॉर्पोरेट घराणे, कंपन्या, दलाल आणि प्रक्रियादारांच्या दावणीला बांधणारी 3 विधेयकं केंद्र सरकारने मंजूर केले. त्यांचं आज कायद्यात रुपांतर झालं असं असलं तरी या कायद्यांना संबंध देशभरात प्रचंड विरोध होत आहे.”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *