कळंबोली येथे महामार्गावर हप्तेखोर गुंडामुळे वाहनधारकासह प्रवाश्यांचा जीवास धोका.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कळंबोली येथे महामार्गावर हप्तेखोर गुंडामुळे वाहनधारकासह प्रवाश्यांचा जीवास धोका.
.
नवी मुंबई ( कळंबोली)

नवी मुंबई येथील कळंबोली एरियामध्ये असणाऱ्या मॅकडॉल हॉटेल समोरून जाणाऱ्या महामार्ग वरती कळंबोली ब्रिजच्या खाली पश्चिम महाराष्ट्राकडे येणाऱ्या प्रवाशांचा बस थांबा आहे. या बस थांब्यावरून पश्‍चिम महाराष्ट्राच्या पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे या बस थांब्याजवळ वाहनांची इतक्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते. एकावेळेस कमीत कमी दहा ते पंधरा वाहने महामार्गावरती उभी असतात. त्यामुळे या ठिकाणी महामार्ग चक्काजाम होतो. अनेक वेळा फार मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि या परिसरामध्ये असलेले स्थानिक आणि मोकाट गुंड प्रवृत्तीचे काही युवक या बस स्थानकावर तळ ठोकून बसलेले असतात आणि वाहन चालक वाहन घेऊन आल्यानंतर त्यांना येथील प्रवाशांना गाडीमध्ये घ्यायचे नाही घेतले तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल. नाही हप्ता दिला तर येथील एकही प्रवासी गाडीमध्ये बसवायचा नाही. अशा दमदाटी करून मारहाण ही करतात. आणि जे वाहनचालक हप्ता देतात त्यांचा राजरोसपणे खाजगी वाहनातून वाहतुकीचा धंदा सुरू असतो. मात्र तरीदेखील पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने का घेत नाहीत.
रायगड पोलीस विभागाने याठिकाणी स्वतंत्र वाहतूक पोलीस चौकी केली आहे. परंतु याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस या गर्दीकडे कानाडोळा करतात. कारण जनतेतून अशी चर्चा सुरू आहे की याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस यांच्या सुद्धा खाजगी गाड्या येथून मुंबई ते पुणे प्रवासी ने-आण करत असतात.

नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा पोलीस प्रशासनाला या नियमबाह्य अवैध धंद्याच्या विरोधात निवेदने दिली आहेत. तरीदेखील रायगड पोलिसांनी आत्तापर्यंत एकदाही एकाही वाहनावर कारवाई केलेली दिसून आले नाही.
मात्र या वाहनचालक व प्रवासी यांच्या जीवावर उठलेल्या गावगुंडांना पोलीस कधी आवरणार असा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *