व्हा. चेअरमन पदावर चांगले कार्यकेल्यामुळे महेंद्र अवघडे यांनाच शिक्षकांची पुन्हा पसंती..!
प्रविण राजे
दहिवडी प्रतिनिधी ता.16
प्राथमिक शिक्षक बँकेचे विद्यमान व्हा. चेअरमन महेंद्र अवघडे यांनी पाच वर्ष शिक्षक सभासदांची चांगली सेवा करून नावलौकिक मिळवल्याने त्यांना या निवडणुकीत पुन्हा उभारण्याची संधी दिली आहे. प्रचारात त्यांनी आघाडी घेतली असून त्यांनी थेट भेटीवर भर दिला आहे. शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष म्हणून शिक्षकांच्या समस्या सोडवणे हे काम ते कायमच करत आल्याने या निवडणुकीत महेंद्र अवघडे यांनाच शिक्षकांची प्रथम पसंती दिसून येत आहे.
सातारा जिल्हा शिक्षक बँकेचे निवडणुकीचे रणधुमाळी अंतिम टप्प्यात असताना माण तालुक्यातील दहिवडी मतदारसंघातून व्हा. चेअरमन महेंद्र अवघडे पुन्हा निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात संजीवन जगदाळे नशीब आजमावत आहेत. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून महेंद्र अवघडे यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. शिक्षक बँकेच्या माध्यमातून त्यांनी सभासदांना चांगली सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्याचबरोबर त्यांचा जनसंपर्क ही चांगला आहे. सभासदांना विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांनी सभासदांची मने जिंकली आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्यांना संघटनेने पुन्हा निवडणुकीत उतरवले आहे सध्या त्यांनी शिक्षकांच्या थेट भेटीवर भर दिला आहे. बँकेच्या सभासदांच्या हिताचे धोरण तसेच सभासदांशी संवाद, सभासदांच्या अडचणी सोडवणे यांना ते नेहमीच प्राधान्य देतात.
बँकेच्या माध्यमातून कर्जाचे कमी केलेले व्याजदर, मयत सभासदांना कर्जमाफी, कोरोना काळात सभासदांना केलेली मदत,बँकेच्या नवीन सुविधांमध्ये एनइएफटी, आरटीजीएस तसेच नेट बँकिंग साठी यशस्वी पाठपुरावा, याचबरोबर गुणवंत पाल्य योजना, सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान,महिला शिक्षकांचा सन्मान, यामुळे शिक्षक सभासद समाधानी असल्याची चर्चा आहे.
या कामाच्या जोरावरच दहिवडी गटातील सभासद विक्रमी मतांनी महेंद्र अवघडे यांना विजयी करतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.












Leave a Reply