*सातारा जिल्ह्यातील माण पंचायत समितीत सत्तेच्या लालसेपोटी राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचा मराठा समाजावर अन्याय*..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

मराठा समाजातील पं.स.सदस्यही या कटात सामील ; लोकशाहीचा गळा आवळून हुकुमशाहीचा उदय

माण पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण महिला खुला प्रवर्गाचे असताना त्या पदावर काम करत असलेल्या मराठा महिला सदस्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.बर यात फक्त इतर समाजातील सदस्यांनी अविश्वास आणला असता तर ठिक होते पण आपलीच माणस आपल्या माणसाच पोय ओढतात या इतिहासाची पुनरावृत्ती झालेली दिसून आली.आपल्या मराठा समाजातील महिला सदस्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी मराठा समाजातीलच सदस्यांचा पुढाकार लाजीरवाणा होता.
मराठा समाज एकतर आरक्षणासाठी धडपडतोय.जिथे आरक्षण मिळतेय तिथे लोकशाहीचा गळा आवळून हुकुमशाही राबवली जातेय.
आता कुठे गेले मराठा म्हणवून घेणारे ,त्यांना आपल्या मराठा समाजावरच्या व्यक्तीवर अन्याय कसा करू वाटतोय.आज त्यांच्यावर वेळ आली असेल तर नंतरची वेळ तुमच्यावरही येऊ शकते.सत्तेच्या व पैशाच्या लालसेपोटी जात विसरू नका.अनेकांना मराठा समाजातल्या व्यक्ती मोठमोठ्या पदावर नकोयत.जातीयवादाचे राजकारण केले जात आहे.पंचायत समितीतही तोच प्रकार चालू आहे.हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आरक्षण असलेले समाजातील स्वार्थी लोक मराठा समाजातील काही लोकांना हाताशी धरत समाजावर अन्याय करत आहेत.
मराठा म्हणून मिरवून घेणारे नेतेमंडळी मराठा समाजातील व्यक्तीलाच खाली खेचण्यासाठी इतरांच्या पायऱ्या बनून राहतायत.
माण पंचायत समितीत मराठा समाजावर अन्यायाची ही दुसरी वेळ आहे.खुल्या प्रवर्गाचे महिला आरक्षण असताना पिंगळीच्या माजी सभापतींना काही दिवसात पदावरून पायऊतार करून हक्काचे आरक्षण असताना दुसऱ्यांना संधी दिली गेली.त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पिंगळीच्याच महिला सभापतीविरोधात करत मराठा समाजावर अन्याय केला गेला.मराठा समाजातील दुसऱ्या व्यक्तीला संधी दिली असती तर आमचे दुमत नाही परंतू हक्काचे आरक्षण डावलून ओबीसींना संधी मिळते हा लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम आहे.अन याला आपलेच मराठा समाजाचे नेते व सदस्य साथ देतात.ही फार मोठी लाजीरवाणी बाब आहे.त्यांना आपल्या जातीचा अभिमान नाही.दुसऱ्यांसाठी पायघड्या टाकण्यात त्यांना आनंद दिसतोय.
समाजाविरोधात जावून आपल्या लोकांवर अन्याय करणाऱ्यांची मराठा समाज नक्कीच दखल घेईल.
माण तालुक्यात जातीयवादाचे बीज रोवले गेले आहे.त्याचाच फटका बसताना दिसून येत आहे.विधानसभा मतदारसंघातही खुले आरक्षण असताना तिथही मराठा समाजावर अन्याय.यातही दुसऱ्यांच्या हातात सत्ता देण्यात आपलेच समाजबांधव पुढे.
वाईट वाटतय एका बाजूला आपण आरक्षणासाठी सर्व विसरून एकत्र येत लढा देतोय अन आपल्याच मातीत मराठा समाजातील व्यक्तींचे पाय ओढतेय.
भविष्यात मराठा समाज नक्कीच याची दखल घेईल हे मात्र निश्चित आज तालुक्यात मराठा समाजाचे मोठे संघटन आहे राजकीय लोकांना याची कल्पना नाही भविष्यात हेच मराठे नक्कीच योग्य तो निर्णय घेतील..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *