सातारा जिल्ह्यातील पदवीधर मतदार गणेश काटकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील

 

संपूर्ण राज्यात दि.१डिसेंबर रोजी होवू घातलेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीचे वारे वाहत असुन पश्चिम महाराष्ट्रातील असणारा पुणे पदवीधर मतदारसंघही त्याला अपवाद नाही.

असे असले तरी पुणे पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्यांंचा समावेश असताना उमेदवारी फक्त सांगली जिल्ह्याला आणि तेही कारखानदार असणाऱ्या संग्राम देशमुख यांना भाजपकडून तर दुसरे कारखानदार असणारे अरुण लाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षांंनी उमेदवारी देण्यात आल्याने बाकीच्या जिल्यातील इच्छुकांसह पदवीधर मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिसून येते. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पदवीधर मतदारांमध्ये नाराजीची तिव्रता स्पष्टपणे जाणवत असुन दोन्ही प्रमुख पक्षांनी सातारा जिल्ह्यावर अन्याय केल्याची भावना सातारा जिल्ह्यातील पदवीधर मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.

त्यामुळे पदवीधरांच्या प्रश्नांची जाणीव असणारे तसेच विद्यार्थी परिषदेपासुन ते मराठा क्रांती मोर्चा आणि विविध सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असणारे आणि त्यामाध्यमातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत युवकांशी घट्ट संपर्कात असणारे सातारा जिल्ह्यातील सर्वांना परिचित असणारे एकमेव अपक्ष उमेदवार श्री.गणेश काटकर यांंच्यापाठीमागे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र म्हणुन मजबूत ताकत उभी करुन सातारा जिल्ह्यातील पदवीधर मतदार सातारा जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी केलेल्या अन्यायाचा हिशोब  मतपेटीतुन चुकता करणार का? हाच खरा प्रश्न आहे.

असे झाल्यास सर्वच राजकीय पक्षांना यापुढे सातारा जिल्ह्याच्या बाबतीत निर्णय घेताना अनेकदा विचार करावा लागेल हे मात्र नक्की.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *