*अप्पर पोलीस अधिक्षक राठोड यांच्या समर्थनार्थ सातारा पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. उदय आठल्ये यांचे गृहराज्यमंत्र्यांनानिवेदन*
*लाईव्ह महाराष्ट्र 24 । सातारा । विशेष प्रतिनिधी ।*
अहमदनगर येथील अप्पर पोलीस अधिक्षक, डॉ. दत्ताराम राठोड यांची अवघ्या तीन आठवड्यात तडकाफडकी बदली करण्यात आली. राठोड यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामगिरी ही वाखणण्याजोगी असून, अनेक प्रशंसनीय कामे त्यांनी केलेली आहेत. राठोडयांच्या नावाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून या क्लिपची सत्यता न पडताळता त्यांची तडकाफडकी केलेली बदली हात्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच आहे, राठोड यांना न्याय मिळावा या आशयाचे निवेदन सातारा पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदयआठल्ये यांच्यावतीने गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना देण्यात आले आहे.
डाँ.राठोड यांना न्याय मिळवून दिल्यास सामान्य जनतेच्या मनामध्ये पोलीस दलाबाबतची प्रतिमा निश्चित उंचावेल,अशीही विनंती उदयआठल्ये यांनी सदर निवेदनाद्वारे केलेली आहे.












Leave a Reply