सोलापूर प्रतिनिधी:- धनंजय माने-पाटील
शिवशंभू कुस्ती आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद आणि पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पै.सचिन चव्हाण यांचा वाढदिवस उद्या दि.11 रोजी शिवशंभू कुस्ती आखाडा वेळापुर ता.माळशिरस येथे साजरा करण्याचे नियोजन पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आले आहे.
यानिमित्ताने उद्या दि.11 रोजी सकाळी 9 वा.व्रक्षारोपण, दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पंढरपूर ब्लड बेंक पंढरपूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर, तसेच संध्याकाळी थंडीपासून संरक्षण होण्यासाठी गरीब गरजुंना शाल व ब्लेंकेट वाटप तसेच जेवण. अशा कार्यक्रमाचे आयोजन पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने करण्यात आले आहे.
पै सचिन चव्हाण हे मल्लविद्या कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्रातील नामांकित पैलवान असल्याने शुभेच्छा देण्यासाठी वेळापुर याठिकाणी.उद्या दि.11 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातुन पैलवान येणार असल्याची माहिती पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य चे पै स्वप्नील माने-पाटील यांनी दिली.












Leave a Reply