औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनीधींची पुण्यात फसवणूक…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनीधींची पुण्यात फसवणूक……सातारा येथील औंध संस्थानाच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनीधींची पुण्यात फसवणूक केली आहे. याप्रकरणी एका वकिलासह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉपर्टीचा बनावट नोटराईज समझोता करारनामा करून खोट्या सह्या करत ही फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी शशी शंकर पोडवाल (वय ५१, रा. आळंदी रोड येरवडा), आसिफ जलिल खान (वय ६१, रा. मार्केटयार्ड), अन्वर युनूस खान पठाण (वय ५४, रा. गोखलेनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अॅडव्होकेट कमलेश पिसाळ (रा. सातारा) याच्यांसह चौघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गायत्रीदेवीचे स्वीयसहायक बलराज अरुण वाडेकर (वय ३७, रा. गुरूवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
बनावट दस्तावेज तयार करुन आरोपींनी गायत्रीदेवीचे यांची  प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र फिर्यादी बलराज अरुण वाडेकर हे प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत होते. याच दरम्यान गायत्रीदेवी यांना हा प्रकार समजला. ही घटना उघडकीस आली
..बनावट दस्तावेज तयार करुन आरोपींनी गायत्रीदेवीचे यांची  प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र फिर्यादी बलराज अरुण वाडेकर हे प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत होते. याच दरम्यान गायत्रीदेवी यांना हा प्रकार समजला. ही घटना उघडकीस आली.  ..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वीयसहायक बलराज अरुण वाडेकर हे गायत्रीदेवी यांचे स्वीयसहायक म्हणून काम पहात आहेत. यामुळे सर्व्हे नंबर ४५८ /१ टिळकरोड, सदाशिव पेठ, पुणे येथील मिळकतीबद्दल आरोपी शशी पोडवाल याने प्रॉपर्टीचा पोट भाडेकर आसिफ व अन्वर  यांच्याशी संगणमत करून  प्रॉपर्टीचा बनावट नोटराईज समझोता करारनामा केला. त्यानंतर गायत्रीदेवी व त्याच्या मुलांचे यावर फोटो लावून खोट्या (बनावट) सह्या केल्या. होत्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *