पत्रकार विशाल माने मारहाण प्रकरणातील आरोपी अजूनही…..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण तालुक्यातील देवापूर येथील माण तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी सचिव व पत्रकार विशाल माने यांना बेदम मारहाण करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ८ ऑक्टोंबर रोजी माणिक सुखदेव बाबर, तुषार माणिक बाबर, नंदा उर्फ जया माणिक बाबर, सुशांत आबासो बाबर, आबासो सुखदेव बाबर यांच्यावर म्हसवड पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र २० दिवस उलटून गेले तरी ही आरोपींना अटक नसल्याने तालुका पत्रकार संघ व तमाम जनतेत पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

 

म्हसवड पोलीस कोणाच्यादबावाला बळी पडत आहेत असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहेत. सदर आरोपी हे खुलेआम म्हसवड शहर व म्हसवड पोलीस स्टेशन परिसरात फिरत असताना म्हसवड पोलीस अजूनही गांधाऱ्याची भूमिका का घेत आहेत? लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाची अशी अवस्था असेल तर सर्व सामान्यांच काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असून सदर प्रकरणातील आरोपीं व त्यांना पाठबळ देणाऱ्या आरोपींची २ दिवसात तात्काळ वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करून आरोपी व पत्रकार यांच्या मालमत्तेचे नुकसान करायला भाग पाडणाऱ्या ठकाना अटक न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील पत्रकार बांधवान तर्फे देण्यात आला आहे.

 

सदरील आरोपी कडे संबंधित जागेची कोणतीही कागदपत्रे नसताना व स्थानिक असल्याच्या कारणावरून बळजबरी करून सदरची जागा कायदेशिर पत्रकार विशाल माने यांच्या नावे असताना बळाचा वापर करून ती हडपण्याचा डाव आखला होता. सदर जागेवरील तारेचे कंपाऊंड काठी कुऱ्हाडी गज, कोयता, यांच्या साहाय्याने तोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदर आरोपींवर धारा ४२७, धारा ५०४,५०६,३४ नुसार म्हसवड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद आहे.

सदरील आरोपी अद्याप पर्यंत मोकाट असून त्यांना कायद्याची कसलीही भीती नसून ते वारंवार पीडित कुटुंबावर स्थानिकांकडून गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणत असून संबंधित प्रकरणाचा तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास होण्याची मागणी जोर धरत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *