म्हसवडचे प्रभारी भावीकट्टी यांची धडाकेबाज कार्यवाही
दहिवडी प्रतिनिधी: धनंजय माने-पाटील
म्हसवड येथील तलाठी कार्यालयातील चोरीस गेलेला ट्रेक्टर म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री.भावीकट्टी यांनी मोठ्या शिताफीने मुद्देमालासह पकडला आणि आरोपीस अटक करण्यात आली.
म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 210/20 भादवि कलम आयपीसी 457 380 याप्रमाणे मंडलधिकारी दळवी यांनी फिर्याद दिली सदर गुन्ह्यातील वाहन ट्रॅक्टर ट्रॉली दंडात्मक कारवाई करण्याकरता तलाठी कार्यालय म्हसवड या ठिकाणी आणून लावले होते.
सदर गुन्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली MH 09 AL 7450 ही दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री चोरीला गेलेली होती त्यानंतर आमच्या गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदरचा ट्रॅक्टर व ट्रॉली हा फलटण पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्ह्यात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली त्यानंतर त्याची याबाबत खात्री करून संबंधित गुन्ह्यातील आरोपी नामे याच्याकडे विश्वासाने विचारपूस केली असता त्याने यापूर्वी त्याच्या ट्रॅक्टर ट्रॉली वर दोन केसेस झाल्यामुळे चिडून जाऊन येथील तलाठी कार्यालयातुन दंडात्मक कारवाई साठी जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेला असल्याबाबतचे सांगितले तसेच सदर ट्रॅक्टर व ट्रॉली चा नंबर बाबत विचारता तो नंबर त्याचा भाऊ नामे सुरेश डावखरे याचे मालकीचा असल्याबाबत समक्ष सांगितले
सदर गुन्ह्यातील आरोपी कडून ट्रॅक्टर ट्रॉली सहित त्यामध्ये एक ब्रास वाळू असा एकूण 3 लाख 9 हजार रुपये मुद्देमाल पूर्ण जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कार्यवाहीत स.पो.नि.भावीकट्टी यांच्यासोबत पो.कॉ. अभिजित भादुले,पो.कॉ.संतोष फडतरे पो.कॉ. नितिन धुमाळ पो. कॉ.सुरज काकडे यांनी सहभाग घेतला.
तरी सदर गुन्ह्यातील आरोपी हा अटकेत असून पुढील तपास स.पो.नि.भावीकट्टी करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री बंसल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री धीरज पाटील साहेब आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री डॉक्टर नीलेश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.












Leave a Reply