सुवर्णाताई या माण देशातील नवदुर्गा
दुष्काळी माण तालुक्यातील म्हसवड शहरात माणदेशी महिलांच्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी शुभम भारत गॅसएजन्सीच्या माध्यमातून सुवर्णाताई सुनील पोरे यांनी उद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला . त्या गॅस एजन्सी हे केवळ नफामिळवण्याचे साधन न मानता समस्त महिला वर्गाची सेवा करण्याचे माध्यम समजून समाजाभिमुख सेवा बजावत आहेत . सुवर्णाताईनाविविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे . समाजातील सर्व स्तरातील घटकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या सुवर्णाताई या माण देशातीलनवदुर्गा आहेत . म्हसवड येथील महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेचे माजी अध्यक्ष सुनील पोरे यांच्या सौभाग्यवती सुवर्णाताई पोरे यांचेशिक्षण बी . एस्सी . झाले आहे . त्यांना शालेय जीवनापासून सामाजिक कार्याची आवड आहे . सुनील पोरे हे शासकीय सेवेत नोकरीकरत होते . त्यांचा विवाह सुवर्णाताई यांच्याशी झाला . सुवर्णाताईनी दि .३० मार्च २००४ रोजी म्हसवड येथे शुभम भारत गॅस एजन्सीचीसुरुवात केली . महामारीच्या काळात म्हसवड हॉस्पीटलमध्ये अॅडमिट असलेल्या रूग्णांसह नातेवाईकांना स्वत : नाष्टा बनवून देतरुग्णांची सेवा केली . गत १७ वर्षे शुभम भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या सौ . सुवर्णाताई सुनिल पोरे यामाणदेशी जनतेच्या आधारवड ठरल्या असून त्या आधुनिक काळातील नवदुर्गा आहेत .












Leave a Reply