सातारा:धनंजय माने (पाटील )प्रतिनिधी :
जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा व सर्व तालुका कार्यकारणी बरखास्त…
सातारा: सातारा जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी आज बरखास्त करण्यात आली अशी माहिती सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे व प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलावडे यांनी पत्रकाद्वारे दिली
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा जयंत पाटील साहेब व युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुका अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारणी बरखास्त करण्यात त आहे अशी माहिती तेजस शिंदे यांनी दिलेल्या पत्रकामध्ये दिले राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो या बालेकिल्ल्याला मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याला खूप मोठा सन्मान असतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पद घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात खूप मोठी स्पर्धा असते त्यामुळे भविष्यात होणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निवडीमध्ये खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळेल
पुढील निवडी बाबतीमध्ये तेजस शिंदे यांनी सांगितले की पक्षातील युवक कार्यकर्त्यांच्या कामाचा अहवाल घेऊन व संघटनात्मक कामाची माहिती घेऊन तसेच नवीन व जुन्या पक्ष कार्यकर्त्यांचा समावेश करून या संघटनेत काम करण्याची इच्छा आहे आणि वेळ देऊ शकणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुलाखती घेऊन संधी देण्यात येईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता प्रत्येक तालुका स्तरावर ती युवकांच्या मध्ये राहील












Leave a Reply