अमृता फडणवीस यांची पुन्हा टीका……..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुंबई : राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. तर, काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?” असा प्रतिप्रश्नच त्यांनी राज्यपालांना केला

आता यावर, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. “वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *